Tuesday, 24 March 2020

नासानं दिला धोक्याचा इशारा; पृथ्वीकडे सरकतायत चार नवीन लघुग्रह

नासानं नव्या चार लघुग्रहांसंबंधी इशारा दिला आहे. अवकाशात सूर्याभोवती फिरणारे सूर्यमालेतील लहान आकाराचे व कमी वस्तुमानाचे ग्रह वेगानं पृथ्वीच्या दिशेनं सरकत आहेत. त्यामुळे काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पण हे लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार असून, पृथ्वीला कोणतंही नुकसान होणार नसल्याचा दावाही या शास्त्रज्ञांनी केला आहे. 21 आणि 22 मार्चदरम्यान दोन लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. सर्वाधिक जवळून जाणारा लघुग्रह 7,13,000 किलोमीटर दूर असेल. अवकाश विज्ञानाच्या जगतात हे अंतर जास्त समजले जात नाही. या व्यतिरिक्त आणखी एक लघुग्रह 3.05 दशलक्ष किलोमीटरच्या अंतरावरून जाणार आहे. 

या लघुग्रहांना 020 FK, 2020 FS, 2020 DP4 आणि 2020 FF1 अशी नावे देण्यात आली आहेत. 2020 FK हा सर्वात लहान लघुग्रह आहे, ज्याचा व्यास फक्त 43 फूट आहे. तो ताशी 37 हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीकडे सरकत आहे. 2020 FS हा लघुग्रह 56 फूट व्यासाचा आहे, तर तो ताशी 15 हजार किलोमीटर वेगाने पुढे जात आहे. भारतीय वेळेनुसार ते लघुग्रह रात्री 8.57 वाजता पृथ्वीच्या जवळून जातील. 

रविवारी सर्वात मोठा लघुग्रह 2020 DP4 पृथ्वीच्या जवळून जाईल. हा लघुग्रह चारपैकी सर्वात मोठा आहे. त्याचा व्यास 180 फूट आहे, तर तो ताशी 47 हजार किलोमीटर वेगाने पुढे सरकतो आहे. याशिवाय 2020 एफएफ 1 व्यासाच्या लघुग्रहाचा आकार 48 फूट आहे. 23 मार्च 2020 रोजी भारतीय वेळेनुसार DP4 दुपारी 12.04 वाजता जवळून जाईल. तर 2020 FF1 सकाळी 3.39 वाजता निघणार असून, या लघुग्रहानं कोणतेही नुकसान होणार नसल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. नासाची या सर्व घटनाक्रमावर नजर आहे. 

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...