🔹खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत.
🔸खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे.
🔹 तो गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देत असे.
🔸 खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.
🔹खोती पद्धत बहुतांशी
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि
सिंधुदुर्ग येथे आढळून येत होती.
🔸खोती पद्धतीने शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण होत होते.
🔹कुळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती.
🔺 ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली.
🔸 त्यांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या.
🔹त्यानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील १४ गावच्या शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.
🔸शेतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते.
🔹शेतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली.
त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.
📚 खोतांचे अधिकार 📚
🔸एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत.
🔹खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.
🔸खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते.
🔹भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.
🔺कोकणातील बहुतांशी खोत घराण्याची आडनावे ही सर किंवा प्रभू या उपसर्गाने सुरु होतात.
➡️ उदा. सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ.
No comments:
Post a Comment