Monday, 16 March 2020

​कोरोना : मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत

✅केंद्र सरकारकडून मोठी घोषणा

चीनमधील वुहानपासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरस पूर्ण जगामध्ये वाढत चालला आहे. कोरोनाव्हायरसने जगभरात आतापर्यंन 4300 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. भारतात देखील भीतीचे वातावरण आहे. भारतात कोरोना विषाणूने दोघांचा बळी घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडून कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत आर्थिक मदत जाहीर केली आहे. या बरोबच, केंद्र सरकारने करोना विषाणूच्या भारतातील उद्रेकाला राष्ट्रीय संकट घोषित केले आहे.

दरम्यान, भारतात आतापर्यंत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात कोरोनामुळे 76 वषीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर, शुक्रवारी दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात 68 वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महिलेल्या तिच्या मुलामुळे कोरोनाचा संसर्ग झाला होता. या महिलेचा मुलगा 5 ते 22 फेब्रुवारी दरम्यान स्वित्झर्लंड आणि इटलीच्या दौऱयावर होता. सध्या महिलेच्या मुलाचा उपचार सुरु आहे.

देशभरात आतापर्यंत एकूण 85 जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे. उपचारांनंतर 10 जण बरे झाले आहेत. करोनाचा उदेक पाहता देश, तसेच जगभरातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. अमेरिकेने तर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे

No comments:

Post a Comment