🔰कुपोषण निर्मूलनाचा एक प्रयत्न म्हणून त्यादृष्टीने चाललेल्या संशोधनामधून पुण्याच्या आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट (ARI) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविकदृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेले गव्हाचे वाण विकसित केले. या गहूला ‘MACS 4028’ असे नाव देण्यात आले आहे.
🔴गव्हाची वैशिष्ट्ये
🔰या नव्या गहूमध्ये 14.7 टक्के एवढे उच्च प्रमाणात प्रथिने असल्याचे आढळून आले आहे. तसेच जस्तचे प्रमाण 40.3 ppm आणि लोहचे प्रमाण 46.1 ppm एवढे आहे.
🔰नवा गहू ‘डुरम गहू’ या प्रकारातला आहे, जो कोरडा प्रदेशात उगवतो. मुख्यत: पास्ता बनविण्यात वापरला जातो आणि म्हणून पास्ता गहू किंवा मकरोनी गहू म्हणून देखील ओळखला जातो.
🔰नवा गहू हे बुटक्या प्रकारातले वाण आहे आणि त्याची संपूर्ण वाढ होण्यासाठी 102 दिवसांचा कालावधी लागतो आणि त्याची हेक्टरी 19.3 क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता आहे.
🔰 नवा गहू पर्णनाशक, तणनाशक, तपकिरी किडे, फोलीयर एफिडस् आणि रूट एफिडस् अश्या उत्पादन घटविणाऱ्या रोगांसाठी प्रतिरोधक आहे.
🔰भारताच्या ‘व्हीजन 2022’, ‘कुपोषण मुक्त भारत’ आणि राष्ट्रीय पोषण धोरणाचे ध्येय साध्य करण्यात मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) यासाठीच्या कृषी विज्ञान केंद्र (KVK) कार्यक्रमात ‘MACS 4028’ गहू समाविष्ट करण्यात आला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment