Thursday, 5 March 2020

अर्थ सचिवपदी अजय भूषण पांडे

-  केंद्रीय अर्थसचिवपदी अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे सध्या महसूल सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते सध्याचे अर्थ सचिव राजीव कुमार यांची जागा घेतील.

- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने पांडे यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. पांडे हे 1984च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत.

-  पांडे हे "युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया'च्या म्हणजेच आधारच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ओळखले जातात. या विभागात ते सप्टेंबर 2010 पासून तब्बल नऊ वर्षे कार्यरत होते. त्यानंतर त्यांची अर्थ खात्यात महसूल सचिवपदी निवड झाली होती.

- पांडे आयआयटी कानपूरचे पदवीधर आहेत. तसेच, त्यांनी मिनिसोटा युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, "पीएचडी'ही केली आहे.
————————————————

No comments:

Post a Comment