Sunday, 8 March 2020

औरंगाबाद विमानतळाचं नामांतर

👉औरंगाबाद विमानतळाचं नामांतर करण्यात आलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद विमानतळाचं नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तशी माहिती दिली आहे.

👉त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

👉यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले आहे याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

👉दरम्यान, मार्च २०१९मध्ये तत्कालिन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याची मागणी केली होती. त्या आधी २०११मध्येही विधानसभेत या नामकरणाचा अशासकीय ठराव आला होता. या नामांतरासाठी वायकरांनी पाठपुरावाही केला होता.

No comments:

Post a Comment