◾️कोरोना विषाणू प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे
◾️. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी 'आयुष्मान भारत' योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केला.
◾️कोरोना संसर्गाचा उपचारही या योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात येणार आहे.
◾️खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना संसर्गाच्या तपासणीसह उपचारापोटी सर्वसामान्यांवर पडणाऱ्या आर्थिक ओझ्यातून त्यामुळे थोडा दिलासा मिळेल, असा दावा यामुळे केला जात आहे.
◾️कोरोना संसर्गासोबत दोन हात करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. केंद्र सरकारने त्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत.
◾️विविध राज्यांतील स्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय लक्ष ठेवून आहे.
◾️देशातील कोट्यवधी लाभार्थ्यांना या योजनेच्या मापदंडानुसार लाभ घेता येईल, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
➖➖➖➖
No comments:
Post a Comment