Monday, 30 March 2020

राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था ‘कोरोना अभ्यास मालिका’ पुस्तके प्रकाशित करणार

भारत सरकारच्या मनुष्यबळ व विकास मंत्रालयांच्या अंतर्गत पुस्तक प्रकाशन आणि पुस्तक संवर्धनासाठी काम करणारी राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था (NBT) यांनी कोविड-19 या विषयावर अभ्यास मालिका प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

भविष्यकाळात मानवी समाजासाठी कोरोना आजारा विषयीच्या जागरूकतेचे विलक्षण मनोवैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन कोरोनाचा प्रभाव ओसारल्यानंतर वाचकांच्या गरजेसाठी सर्व वयोगटांकरिता ही पुस्तके तयार करण्यात येत आहे. उपक्रमाच्या अंतर्गत योग्य वाचन साहित्य तयार करण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती घेतली जात आहे.

उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ‘सायको-सोशल इम्पॅक्ट ऑफ कोरोना पॅन्डमिक अँड वेज टू कोप’ या उप-विषयावर पुस्तके तयार करण्यासाठी अनुभवी मानसशास्त्रज्ञ / सल्लागारांचा समावेश असलेला एक अभ्यास गट तयार करण्यात आला आहे.

कोरोनाच्या विविध पैलूंविषयी जाणून घेण्यासाठी मुलांची पुस्तके तयार केली जात आहोत. जागरूकता, कला, साहित्य, लोकसाहित्य, आर्थिक आणि समाजशास्त्रीय बाबी, कोरोना महामारीतून उद्भवणारी विज्ञान / आरोग्य जागरूकता आणि विलगीकरण, संचारबंदी या विषयांवर आधारित पुस्तकेदेखील नियोजित आहेत.

राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था (NBT) विषयी

राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था (NBT) हे एक भारतीय प्रकाशन गृह आहे, ज्याची 01 ऑगस्ट 1957 रोजी स्थापना झाली. हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत एक स्वायत्त संस्था आहे. आता ही संस्था मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

No comments:

Post a Comment