Thursday, 26 March 2020

आकाशगंगा

       सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित 8 ग्रह फिरतात.

        चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

         प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होतो.

       चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात.

         एका अमावस्येपासुन दुसर्यार आमवस्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो.

        एकूण 88 तारकासमूह मानले जातात. त्यातील 37 तारकासमूह उत्तर खगोलीय तर 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

  प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.

        प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

         बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त 88 दिवस तर नेपच्यूनचा सुमारे 146 वर्षे इतका मोठा असतो.

      बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे. 

         पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला 'पहाटतारा' म्हणतात.

       पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना 'अंतर्ग्रह', तर कक्षेबाहेरील ग्रहांना 'बाह्यग्रह' म्हणतात.

       'मंगळ' हा पहिला बाह्यग्रह आहे.

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे 'गुरु'

       गुरूला एकूण 63 उपग्रह आहेत.

         शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

       शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

      धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.

       हॅले हा धूमकेतू 76 वर्षानी दिसतो. आता 2060 मध्ये दिसेल.

         भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला.

       त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - 1, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.

इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत 21 उपग्रह सोडण्यात आले. 

        GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.

       टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

        आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार 1975 पासून अंमलात आला आहे.

        जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या 1992 च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

No comments:

Post a Comment