Thursday, 26 March 2020

भारतातील करोनाग्रस्त वाढण्याचा वेग मंदावला.

जगभरामध्ये करोना विषाणूचा संर्सग वाढत असताना देशामध्येही करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतानाचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी संध्याकाळी बुधवारपासून २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन असेल अशी घोषणा केली. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत सर्वांनी घरातच बसावे असं आवाहन मोदींनी केलं आहे.

करोनाची संक्रमण श्रृंखला तोडण्यासाठी हा २१ दिवसांच्य लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येत असल्याचेही मोदींनी स्पष्ट केलं. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या आकडेवारी लॉकडाउनचा निर्णय घेतल्यानंतर करोनाग्रस्तांची संख्या कमी प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी दुपारी बारावाजेपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या मंगळवारच्या तुलनेत ५७ ने वाढला. बुधवारी दुपारी देशामध्ये ५३९ करोनाग्रस्त रुग्ण होते. हीच संख्या मंगळवारी ६७ ने वाढला होता.

सध्या ही बातमी सकारात्मक असली तरी ही प्राथमिक आकडेवारी आहे. अमेरिका आणि भारताची तुलना केली असता अमेरिकेतील रुग्णांची संख्या ही भारतापेक्षा अधिक झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील पाच दिवसांमध्ये भारतातील करोनाग्रस्तांची संख्या दुप्पट झाली आहे. याच वेगाने करोनाग्रस्तांची संख्या वाढत राहिल्यास या आठवड्याच्या शेवटपर्यंत भारतातील करोनाग्रस्तांची संख्या एक हजारहून अधिक असेल.

पहिल्या २४ तासांमध्ये करोनाग्रस्तांचा देशातील संख्या वाढण्याची गती मंदावली असली तरी लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी अनेक लोकांनी जिवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळालं.

त्यामुळे सरकारी प्रयत्नांना जास्तीत जास्त यश यावे म्हणून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेक दिग्गज नेते, कलाकार, खेळाडूंनी नागरिकांना २१ दिवस जास्तीत जास्त काळ घऱात थांबू आणि करोनाला हरवू अशापद्धतीचे आवाहन केल्याचे चित्र सोशल नेटवर्किंगवर दिसत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...