Friday, 13 March 2020

राज्यातील शाळांमध्ये ‘मुलींचा आदर’ संकल्पना राबवण्याचे निर्देश

🔰 जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘मुलींचा आदर’ ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून राज्यभरातील शाळांमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश शालेय शिक्षण खात्याने शुक्रवारी दिले.

🔰८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे, मुलींप्रती आदर व्यक्त करणे, हक्काची जाणीव निर्माण करणे व अन्य हेतू ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन शालेय पातळीवर करण्याची सूचना आहे. ८ मार्चला रविवार असल्याने ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या आठवडय़ात हे उपक्रम राबवायचे आहेत.

🔰इयत्ता चौथी ते आठवीचे वर्ग असणाऱ्या शाळांमध्ये मुलां-मुलींसाठी चांगल्या-वाईट स्पर्शाबाबत जागृती करणे. शारीरिक, मानसिक  त्रास किंवा लैंगिक शोषण यासारखे प्रसंग घडल्यास त्याची माहिती शिक्षक, पालक किंवा मित्रांना देण्याबाबत अवगत करण्याचे मार्गदर्शन अपेक्षित आहे.

🔰माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये जीवन कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याची सूचना आहे. या माध्यमातून मुलगा-मुलगी समानता, कौटुंबिक नातेसंबंध, हार्मोन्समुळे होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीचे व्यवस्थापन याबाबत जागृती करायची आहे. आठवी ते दहावी इयत्तेतील मुला-मुलींसाठी ‘मुलींचा आदर’ या विषयावर चर्चासत्र होतील. मुलगा-मुलगी समान असल्याची भावना पालकांमध्ये निर्माण होण्यासाठी मुली जी कामे करतात ती कामे मुलांनीही करावी, असे समानतेचे विचार रुजवण्याच्या हेतूने पालकसभा, माता-पालक संघाच्या बैठकी घेण्याचे निर्देश आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...