Saturday, 19 August 2023

नाम व त्याचे प्रकार

 प्रत्यक्षात असणार्‍या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला 'नाम' असे म्हणतात.

 उदा. टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खरेपणा, औदार्थ, देव,स्वर्ग, पुस्तक इ.

 नामाचे प्रकार :

·         नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.

सामान्य नाम -

·         एकाच जातीच्या पदार्थातील समान गुण धर्मामुळे त्या वस्तूचे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला 'सामान्य नाम' असे म्हणतात.

उदा. मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध,सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.

 

·         ( सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते. )

विशेष नाम -

·         ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास 'विशेष नाम' असे म्हणतात.

उदा. राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन,अमेरिका,गोदावरी इ.

·         ( विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नाही आल्यास सामान्य नाम समजावे. )

उदा. या गावात बरेच नारद आहेत.

भाववाचक नाम -

·         ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला 'भाववाचक नाम' असे म्हणतात.

उदा. धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.

 

·         ( पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिति किंवा क्रिया दाखविणार्यां नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.

उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात. )

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...