Monday, 16 March 2020

ग्रीसमध्ये पहिली महिला अध्यक्ष

🔸 ग्रीसच्या उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश कतरिना साकेल्लारोपोलो यांची देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. शुक्रवारी एका साध्या समारंभात त्यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली.

🔸निवडणुकीत विजय मिळाल्यानंतरही दोन महिन्यांच्या कालावधीनंतर कतरिना यांना शपथ घेतली असून, करोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर शपथविधी सोहळा पार पडला. या वेळी अगदी मोजके लोकप्रतिनिधी आणि पत्रकार उपस्थित होते. कतरिना यांनी मास्क लावूनच शपथ घेतली.

🔸ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकीस यांनी कतरिना यांच्या नावाला अनुमोदन दिले होते. जानेवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीत कतरिना २९४ पैकी २६१ मते मिळवून त्या मोठ्या मताधिक्याने जिंकून आल्या.

🔸 ग्रीसमध्ये राजकारणात ज्येष्ठ पदांवर अगदी मोजक्याच महिला आहेत. त्यामुळे मित्सोटाकीस यांनी कतरिना यांच्या नावाला अनुमोदन दिल्यानंतर त्यांना संसदेतील पुरुषांच्या टीकेला सामोरे जावे लागले. ग्रीकच्या मंत्रिमंडळात सध्या १८ वरिष्ठ पदांवर पुरुष असून, त्यामध्ये एकाही महिलेला स्थान मिळालेले नाही.

🔸करोना'मुळे ग्रीसमध्ये शाळा, कॉलेज, विद्यापीठे, सिनेमागृहे, व्यायामशाळा, नाइटक्लब बंद ठेवण्यात आले आहे. ग्रीसमध्ये आतापर्यंत ११७ जणांना करोनाची लागण झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...