Sunday, 8 March 2020

बेंगळुरूमध्ये दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय

🔰 कर्नाटक राज्याच्या बेंगळुरू या शहरात प्रेस्टीज फाल्कन टॉवर्स या ठिकाणी “म्यूजियम ऑफ इंडियन पेपर मनी” या बँकनोटांच्या संग्रहालयाचे उद्घाटन उद्योजक रेझवान रझाक ह्यांच्या हस्ते करण्यात आले. हे देशातले द्वितीय तर दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय आहे. पहिल्या संग्रहालयाची भारतीय रिझर्व्ह बँकेनी मुंबईत स्थापना केलेली आहे.

🔴सग्रहालयाची वैशिष्ट्ये

🔰 ब्रिटिशांना ‘भारत छोडो’ असा संदेश मिळाला होता अश्या स्वातंत्र्यपूर्व युगात चलनात असलेल्या नोटा, ‘जय तेलंगणा’ या राजकीय संदेशाला अनुसरून असलेल्या नोटा, 1000 रुपयांची नोट अश्या सर्व बँकनोटांचा समावेश या नव्या संग्रहालयात करण्यात आला आहे.

🔰 ब्रिटीश राजवटीआधीच देशात विकसित झालेल्या कागदी नोटांनी भरलेल्या या संग्रहालयात गेल्या 20 वर्षांच्या कालावधीतल्या 700 हून अधिक कलाकृती संग्रहित करण्यात आल्या आहेत.

🔰 सर्वात जुनी नोट म्हणजे 1812 साली प्रसिद्ध झालेली नोट होय. तसेच पोर्तुगीज सरकारने गोव्यामध्ये 1924 मध्ये प्रसिद्ध केलेल्या रु. 50 आणि रु. 500 इतके मूल्य असलेल्या नोटा देखील ठेवण्यात आल्या आहेत.

🔰 तिथे 10,000 रुपये इतके उच्च मूल्य असलेली पूर्वीची नोट देखील प्रदर्शनात ठेवली गेली आहे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...