Friday, 13 March 2020

काश्मीरमध्ये नवा राजकीय पक्ष

● मेहबुबा मुफ्ती सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम केलेल्या अल्ताफ बुखारी यांनी काश्मीरमध्ये 'अपनी पार्टी' नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आहे.

🗣 अल्ताफ बुखारी म्हणाले..

▪ या भागताील सामान्य लोकांचा हा पक्ष असेल, त्यामुळेच याचं नामकरण 'अपनी पार्टी' असं करण्यात आलं आहे.

▪ आमच्यासमोर खूप साऱ्या अपेक्षा आणि आव्हानं आहेत, मी जम्मू-काश्मीरच्या लोकांना विश्वास देऊ इच्छितो की माझी इच्छाशक्ती मजबूत आहे.

★ यांनी दिला पाठिंबा :
माजी मंत्री आणि डेमोक्रेटिक पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष गुलाम हसन मीर, पीडीपीचे माजी आमदार दिलावर मीर, नूर मोहम्मद शेख, अशरफ मीर आणि माजी काँग्रेस आमदार फारुख अंद्राबी, इरफान नकीब आणि इतर स्थानिक नेते

★ दरम्यान, कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण असून येथील अनेक नेते नजरकैदेत आहेत.

★ या पार्श्वभूमीवर नवीन राजकीय पक्षाचा उदय झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...