Thursday, 23 December 2021

सामान्य विज्ञान

- अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर एक पेशीचे बनलेले असते.
- चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता असे म्हणतात.

- प्राणी : जीवनकाळ
घरमाशी - 1 ते 4 महिने
कुत्रा - 16 ते 18 वर्ष
शहामृग - 50 वर्ष
हत्ती - 70 ते 90 वर्ष

- वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरोलेस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते.
- बुरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, नेचे व कवक यांना फुले येत नाहीत.
- वड, उंबर, बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहेत.
- व्दिवार्षिक वनस्पती - मुळा, गाजर, बीट.
- वार्षिक वनस्पती - सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका.

- जलचर प्राणी - मासा, जेलीफिश, ऑक्टोपस
- उभयचर प्राणी - बेडूक, कासव, सुसर

- वडाच्या खोडावरील पारंब्या या वडाची मुळे आहेत. कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे.

- पेर आणि पान यांच्या दुबेळक्यात कोंबासारखा भाग दिसतो त्याला मुकूल म्हणतात. मूळाच्या टोकाशी मूलटोपी असते.
- जायांग स्त्रीकेशराचा बनलेला असतो.

- वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारात ज्यांचे मापन करायचे असते, त्यांना राशी असे म्हणतात.
- MKS आणि CGS या प्रचलित मापन पद्धती आहेत.
- गोलंदाजीच्या वेगाचे मापन रडार प्रणालीव्दारे केले जाते.
- स्थिर वस्तूला हलविण्यासाठी बलाची आवश्यकता असते.

- मॅगलेव्ह ट्रेन ही चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किमी वेगाने धावते.
- घर्षणबल गतीच्या विरोधात कार्य करते.
- घर्षनामुळे वीज निर्माण होणार्‍या बलाला स्थितीक विद्युत बल असे म्हणतात.

- एका दिशेने जाणार्‍या गतीला रेषीय गती असे म्हणतात.
- ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.
- आधाराभोवती हालणार्‍या आणि न वाकणार्‍या दांड्याला तरफ म्हणतात. हे साधे यंत्र आहे.

- कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.
- पदार्थाच्या ताणामुळे / स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात.
- गतीज ऊर्जेचा वापर करून डायनॅमोमध्ये विद्युतनिर्मिती होते.
- पारंपारिक ऊर्जा स्त्रोत - कोळसा, डिझेल, पेट्रोल

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...