०४ मार्च २०२०

ग्लॅमरस टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती

🔰5 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या रशियाच्या ग्लॅमरस टेनिसपटू मारिया शारापोव्हाने निवृत्ती स्विकारलेली आहे.

🔰तर आपल्या कारकिर्दीत शारापोव्हाने फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेची 2, तर ऑस्ट्रेलियन-विम्बल्डन आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेचं प्रत्येकी एक विजेतेपद मिळवलं आहे. मध्यंतरी उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात शारापोव्हावर बंदी घालण्यात आली होती.

🔰तसेच यानंतर शारापोव्हाने दमदार पुनरागमन केलं, मात्र यानंतर तिला एकाही मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलं नाही.

🔰आपल्या उमेदीच्या काळात शारापोव्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून शारापोव्हा फॉर्मात नव्हती, ज्यामुळे अखेरीस तिने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...