Tuesday, 3 March 2020

समजून घ्या सहज सोपं : अमेरिका-तालिबान करार काय आहे?

◾️कतारची राजधानी दोहा येथे शनिवारी (दि. २९ फेब्रुवारी) अमेरिका आणि तालिबान यांच्यात करार झाला.

◾️ या करारान्वये अफगाणिस्तानातून अमेरिका आणि उत्तर अटलांटिक करार संघटनेच्या (नाटो) संपूर्ण फौजा टप्प्याटप्प्याने माघारी बोलावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

🔰 पार्श्वभूमी

◾️जवळपास १८ वर्षे अमेरिकी सैन्य अफगाण भूमीवर तैनात होते.

◾️अमेरिकेवरील ९/११ हल्ल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश धाकटे यांनी ओसामा बिन लादेन आणि अल कायदाविरोधात जागतिक लढ्याचा पुकार केला.

◾️ओसामा अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर दडून बसला होता. त्यावेळी अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबानचाही ओसामाला उघड पाठिंबा होता

◾️. साहजिकच अफगाणिस्तान ही दहशतवादविरोधी लढ्याची रणभूमी बनली. ऑक्टोबर २००१मध्ये अमेरिकी फौजा काबूलमध्ये उतरल्

◾️. डिसेंबर २००१मध्ये तालिबान शासक मुल्ला मोहम्मद उमरने काबूलमधून पळ काढला. तालिबानचा पराभव झाला, पण समूळ निःपात झाला नाही.

◾️बुश यांच्यानंतरचे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराकपाठोपाठ अफगाणिस्तानातूनही फौजा माघारी बोलावण्याविषयी निर्णय घेतला.

◾️ परकीय भूमीवर अमेरिकी सैनिकांचे रक्त सांडणाऱ्या युद्धखोर धोरणांचा जमाना सरला ही त्यामागील भूमिका होती. शिवाय ओबामांच्या दोन टर्म्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देऊन मनुष्यहानी टाळण्याकडे कल वाढला

◾️ ओबामा यांच्यानंतरचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर कृतघ्नांच्या निरुपयोगी लढाया येथून पुढे आम्ही लढणार नाहीʼ अशी भूमिका घेतली. फौजामाघार हे त्यांचे निवडणूक वचन आणि निवडून आल्यावर राष्ट्रीय धोरण बनले.

🔰 करारात काय?

◾️अफगाणिस्तानातून अमेरिकी फौजा माघारी घेण्यासाठी १४ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

◾️यात पहिल्या टप्प्यात करार झाल्यानंतरच्या १३५ दिवसांत अमेरिकी सैनिकांची संख्या १३,०००वरून ८६००वर आणली जाईल.

◾️तर नाटोʼ सैनिकांची संख्या १६,०००वरून १२,०००वर आणली जाईल.

🔰मात्र यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

◾️तालिबानने दहशतवादी हल्ले थांबवावेत, ही पहिली आणि महत्त्वाची अट.

◾️यासाठी तालिबानने अल कायदाशी संबंध तोडणे अपेक्षित आहे. या अटींची पूर्तता न झाल्यास करारातून एकतर्फी माघार घेण्याची मुभा अमेरिकेला राहील.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...