🔴'लॉकडाऊन' म्हणजे काय?
1.आपात्कालीन परिस्थितीत सरकारकडून लॉकडाऊन घोषित केला जातो. यामध्ये अत्यावश्यक सेवा बंद केल्या जात नाही. सध्या, बँक, दूध डेअरी, औषध, रेशनिंग, फळ-भाज्या यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सुरू असलेली दिसतात.
2.तुम्ही जिथे असाल तिथंच थांबावं हा लॉकडाऊनचा हेतू असतो. यामध्ये नागरिकांना एखाद्या इमारतीत, भागात, राज्य किंवा देशापर्यंत सीमित केलं जातं. बऱ्याचदा नागरिकांना या नियमांत सूटही दिली जाते.
3.लॉकडाऊनमध्ये मुख्यत्वे: नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडणारी कारणं बंद केली जातील यावर भर दिला जातो. खासगी कंपन्यांना लॉकडाऊन पाळावा लागल्यानं कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' किंवा सुट्टी जाहीर करावी लागली.
4.लॉकडाऊनमध्ये लोकांना घरातच राहण्याची आणि रस्त्यावर न फिरण्याचं आवाहन केलं जातं. केवळ आवश्यक गोष्टींसाठी त्यांनी घराबाहेर पडणं अपेक्षित असतं.
5.लॉकडाऊन दरम्यान कोणत्या प्रकारच्या सेवांना सूट दिली जावी? हे तिथलं स्थानिक प्रशासन ठरवतं
6.सध्या, करोनाचं संक्रमण फैलावू नये यासाठी लोकांनी घरातच ठेवण्यासाठी अनेक राज्यांत लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय.
🔴'कर्फ्यू' म्हणजे काय?
1.अत्यंत गंभीर परिस्थिती 'कर्फ्यू'ची अंमलबजावणी केली जाते. ही स्थिती नागरिकांसाठी थोडी अडचणीची ठरू शकते. कारण नागरिकांना कर्फ्यूच्या नियमांचं पालन करावंच लागतं कारण हा प्रशासनाचा 'आदेश' असतो.
2.या दरम्यान नागरिक आपल्या भागात किंवा रस्त्यांवर गर्दी करून उभे राहू शकतं नाहीत
3.मुख्य म्हणजे, कर्फ्यूच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना पोलीस अटक करू शकतात. तसंच अशा नागरिकांना दंडही भरावा लागू शकतो
4.कर्फ्यू दरम्यान नागरिकांना आपल्या घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही
5.कर्फ्यू दरम्यान शाळा, महाविद्यालय, बाजार बंद ठेवले जातात
6.कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सुविधा सुरू राहील, याची काळजी प्रशासन घेतं
7.कर्फ्यू दरम्यान बाजार आणि बँकसारख्या सेवाही बंद केल्या जातात
8.स्थानिक प्रशासनाकडून कर्फ्यू शिथील करण्यात आल्यानंतरच नागरिकांना घरातून बाहेर पडण्याची परवनानगी असते
📌दरम्यान, देशभरात आत्तापर्यंत ५२५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. तसंच १० जणांनी करोनामुळे आपला जीव गमावला आहे.
No comments:
Post a Comment