Sunday, 22 March 2020

मराठी व्याकरण :- विरामचिन्हे

विराम चिन्हांचा वापर भावनांच्या,विचारांच्या आविष्कारासाठी आवश्यक व महत्त्वाचा ठरतो. भाषा व्यवहारात लेखन, भाषण , वाचन या क्रिया सतत व सातत्याने घडत असतात.       

जेव्हा आपण लेखन करतो तेव्हा कथन केलेले वाचकांच्या लक्षात यावे म्हणून विरामचिन्हांचा वापर केला जातो. कोणताही मजकूर वाचत असताना लिहलेला अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो. या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात. हा विराम कधी अल्प असतो तर कधी त्यापेक्षा अधिक असतो. कधी एखादे वाक्य बोलनाऱ्या व्यक्तीच्या मुखातील असतो.           

बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द व वाक्ये यांमध्ये काही काळ थांबावे लागते. कोठे किती थांबावे, हे ध्यानात येण्यासाठी जी विशिष्ट चिन्हे वापरतात, तीच विराम चिन्हे होत.          

आपण संभाषण करताना/बोलताना थांबतो म्हणजेच विराम घेतो आणि तो ज्या चिन्हांनी दर्शविला जातो त्या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात.           

विराम म्हणजे थांबणे. बोलताना आपण आवश्यकतेनुसार कमी अधिक वेळ थांबू शकतो, परंतु लिहिताना तसे करता येत नाही, म्हणून ही थांबण्याची क्रिया विरामचिन्हाव्दारे दर्शवली जाते.        

🟤विरामचिन्हचे प्रकार पुढीलप्रमाणे🟤        

१) पूर्णविराम (.)

२) अर्धविराम (;)

३) स्वल्पविराम (,)

४) अपूर्णविराम (:)

५) प्रश्नचिन्ह (?)

६) उद्गारवाचक (!)

७) अवतरणचिन्ह ("-")

८) संयोगचिन्ह (-)

९) अपसरणचिन्ह (_)

१०) विकल्प चिन्ह (/)      

No comments:

Post a Comment