Monday, 30 March 2020

एमएपीएसीसह विद्यापीठांच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर 

सोलापूर : कोरोना या विषाणूचे संक्रमण खंडीत करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने लॉकडाउनचा कालावधीत 31 मार्चवरुन 14 एप्रिलपर्यंत वाढविला आहे. दरम्यान, रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्यात आणखी बदल होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आता एमपीएससीने राज्य सेवेची परीक्षा तर विद्यापीठांनी पदवी व पदवीत्तोर विद्यार्थ्यांची परीक्षा पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 


राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता दोनशेहून अधिक झाली असून देशात एक हजारांहून अधिक रुग्ण कोरोनाबाधित आहेत. लॉकडाउननंतरही देशातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने जीवनावश्‍यक वस्तूची दुकाने (आस्थापना) वगळता सर्व शासकीय, खासगी कार्यालये, व्यवसाय, उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला. तर विद्यापीठासह दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर एमपीएससीतर्फे 26 एप्रिलला राज्य सेवेची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, आता या सर्व परीक्षा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीएससीचे सचिव राज्य सेवा परीक्षेची पुढील नियोजन जाहीर करतील, अशी माहिती अव्वर सचिव राजेंद्र वाघ यांनी सांगितले. 


पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा नाहीत 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत लॉकडाउन घोषित केला, परंतु त्यात पुन्हा 14 एप्रिलपर्यंत वाढ केली. दरम्यान, 1 एप्रिलपासून परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने सुरु केले होते. मात्र, लॉकडाउनचा कालावधी वाढेल म्हणून आता पुढील आदेश येईपर्यंत संपूर्ण परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. 

- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...