जर तुम्ही ‘एटीमएम’मधून पैसे काढायला गेला व तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसतील, तर तुम्हाला २५ रुपये दंड आकारला जाणार आहे. खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने १ एप्रिल २०२० पासून हा दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्यावतीने वेबसाइटवर परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत पुरेसे पैसे नसल्याने एटीएमधून पैसे काढता न आल्याबाबत कोणताही दंड आकारला जात नव्हता.
याशिवाय अन्य चार प्रकारच्या दंडाची रक्कम बँकेकडून वाढवण्यात आली आहे. आता NACH व्यवहार अयशस्वी झाल्यावर ६५० रुपये दंड आकारला जाणार आहे, जो आतापर्यंत ५०० रुपये होता. याशिवाय अन्य बँकेचा धनादेश न वठल्यास २५० रुपये, ऑटो डेबिट न झाल्यास ३०० रुपये दंड आकारला जाणार आहे. यासाठी आतापर्यंत २५० रुपये आकारले जात होते. एवढेच नाहीतर बँकेने शाखांबरोबरच्या व्यवहारांसंबंधीचे नियम देखील ठरवले आहेत.
अॅक्सिस बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार शाखेतून १५ ट्रांजेक्शन मोफत होतील व त्यानंतर प्रत्येक ट्रांजेक्शनला ७५ रुपये पडतील. एवढेच नाहीतर चेकबुक घेण्यासाठी आता १०० रुपये द्यावे लागणार आहेत. अगोदर यासाठी ६० रुपये घेतले जात होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा