🔰ATM मशीन्समध्ये लवकरच एक महत्वाचा बदल होणार आहे. त्यामुळे यापुढे तुम्हाला ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत.
🔰देशभरातील दोन लाख 40 हजार एटीएम मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटेचा रॅक हटवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
🔰त्यामुळे यापुढे ATM मधून 100, 200 आणि 500 रुपयाच्याच नोटा निघतील.
तर ATM मशीन मध्ये चार ट्रे असतात.
🔰त्यातल्या तिघांमध्ये 500 आणि एकात 100 किंवा 200 रुपयाच्या नोटा ठेवल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
🔰तसेच काही दिवसांपूर्वीच इंडियन या सरकारी बँकेने देशभरातील आपल्या 3 हजार एटीएम मशीन्समध्ये दोन हजाराची नोट भरण्याची प्रक्रिया बंद करण्याचे निर्देश दिले होते.
No comments:
Post a Comment