Tuesday, 10 March 2020

करोना तपासणीसाठी देशात 52 प्रयोगशाळा..

🔰नवी दिल्ली : करोना रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी देशात आणखी ५२ प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. याशिवाय ५७ प्रयोगशाळा या रुग्णांचे नमुने गोळा करण्यासाठी अधिसूचित करण्यात आल्या आहेत त्यामुळे तपासणी व निदानाची सुविधा वाढणार आहे. दरम्यान देशातील निश्चित रुग्णांची संख्या आता ३४ झाली असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

🔰अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीओव्हीआयडी १९ विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी सध्याच्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याने आणखी  ५२  प्रयोगशाळांत नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून  ५७ प्रयोगशाळांत नमुने संकलित करण्याची सोय करण्यात आली आहे.

🔰६ मार्चअखेर एकूण ३४०४ जणांचे एकूण ४०५८ नमुने गोळा करून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात वुहानमधून आलेल्या ६५४ जणांच्या १३०८ नमुन्यांचा समावेश आहे. या लोकांना आयटीबीपी छावणी, मनेसर छावणी येथे ठेवण्यात आले होते. दिवस शून्य व दिवस १४ या दोन दिवशी त्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. वुहान, डायमंड प्रिन्सेस जहाज येथून आणलेल्या भारतीयांची तपासणी दिवस शून्य रोजी करण्यात आली आहे. आता १४ दिवसांनी पुढची तपासणी केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...