युरोपमधल्या अर्मेनिया या देशाने शस्त्रास्त्रे शोधणारे रडार याचे चार संच पुरवण्यासाठी भारताची निवड केली आहे. हा 40 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा संरक्षण करार आहे.
या करारानुसार भारत देशातच तयार करण्यात आलेले 4 ‘SWATHI’ रडार अर्मेनियाला पुरवेल.
‘SWATHI’ रडार संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांनी विकसित केले असून भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) निर्मित आहे. हे रडार त्याच्या 50 किलोमीटरच्या क्षेत्रात शत्रुची शस्त्रास्त्रे शोधण्यास सक्षम आहे.
⌛️अर्मेनिया हा पश्चिम आशिया आणि युरोपच्या काकेशस क्षेत्रात वसलेला एक पर्वतीय देश आहे. देशाची राजधानी येरेवन हे शहर आहे आणि द्राम हे राष्ट्रीय चलन आहे.
No comments:
Post a Comment