▪ राज्यात 1500 आदर्श शाळा समोर आणल्या जाईल, प्रत्येक जिल्ह्यात 4 आदर्श शाळा बनवणार
▪ भूमिपुत्रांना 80% नोकरीसाठी कायदा करू
▪ 35 कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग, उरलेली रक्कम खरीप हंगाम 2020 च्या आधी वर्ग करणार
▪ शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर पंप बसवण्यात येणार आहेत यासाठी 6700 कोटींची तरतूद
▪अण्णासाहेब पाटील महामंडळास ५० कोटी
▪ पेट्रोल डिझेल च्या दरात 1 रुपयांची वाढ
▪ शिकाऊ योजनेसाठी 6000 कोटी रुपये
▪ 10वी उत्तीर्णांना रोजगार प्रशिक्षण देणार
▪ माध्यमिक शाळांतील मुलींना माफक दरांत सॅनिटरी नॅपकिन, नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्र बसवणार
▪ उच्च तंत्र शिक्षणासाठी 1300 कोटी रुपये
▪ 5 वर्षात 100000 बेरोजगार प्रशिक्षित होणार
▪ मेडिकल डिग्री च्या 118 जागा वाढवणार
▪ प्राथमिक आरोग्यसेवेसाठी 5 हजार कोटी, पाटण आणि साकोलीतल्या रुग्णालयांचं 100 खाटांच्या रुग्णालयात रूपांतर होणार
▪ 1657 कोटींचा निधी मेट्रोच्या राज्यभरातल्या कामांसाठी देण्याचा सरकारचा विचार
▪ नंदुरबार मध्ये नवे मेडिकल कॉलेज
▪ कबड्डी कुस्ती स्पर्धांना 75 लाख अनुदान
▪ खो - खो व्हॉलीबॉल स्पर्धांना 75 लाख अनुदान
▪ बालेवाडीत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
▪ कर्नाटकात मराठी वृत्तपत्रांना अनुदान देणार
▪ एस टी बसस्थानकांसाठी 456 कोटी
▪ महामंडळाच्या ताफ्यातल्या जुन्या बसच्या जागी 1600 नवीन बस येणार, बस स्थानकं अत्याधुनिक होणार त्यासाठी 401 कोटी रुपये
▪ महामार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी 3500 कोटी तरतूद
▪ महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र, सागरी महामार्गांसाठी 3595 कोटींचा निधी
▪ ऊर्जा विभागास 8 कोटी रुपये
▪ 102 क्रमांकाच्या जुन्या रूग्णवाहिका बदलल्या जाणार
▪ प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलीस ठाणे
▪ महिला बचत गटांकडून 1000 कोटींची खरेदी करणार
▪ 10 रुपये शिवथाळी भोजन योजना - प्रत्येक केंद्रावर 500 थाळी - 1 लाख थाळींचं उद्दिष्टं - 150 कोटी रुपये
▪ पेट्रोल डिझेल च्या दरात 1 रुपयांची वाढ
▪ पाणीपुरवठा विभागासाठी 2043 कोटी
▪ मुंबईत मराठी भाषा भवन बांधणार
▪ मुबंईत वस्तू व सेवा केंद्र बांधणार, त्यासाठी 148 कोटी रुपये
▪ नाग , इंद्रायणी , वालधुनीचे प्रदूषण रोखणार ; पर्यावण विभागासाठी 230 कोटी रुपये
▪ वनविभागाची 1630 कोटी रुपये
▪ वरळीत पर्यटन संकुल उभारणार
▪ सोलापूर व पुणे येथे नवे विमानतळ उभारणार
▪ लोणार सरोवराचाही विकास करणार
▪ मुरुड जंजीरयाचा सुशोभिकरण करणार
▪ कोकणच्या काजू प्रकल्पासाठी 15 कोटी
▪ आमदार विकास निधी दर वर्षी 3 कोटी होणार;
▪ पर्यटन विकासाठी एकूण 1400 कोटी
▪ मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना हा नवीन कार्यक्रम 2010 कोटींचा निधी तसेच सिंचनासाठी 10,235 कोटी
▪ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आठवणी 4 कोटी रुपये
▪ सामाजिक न्याय विभागास 9668 कोटी रुपये
▪ पुण्यात मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह
▪ नाट्यसंमेलनांना 10 कोटी रुपये अनुदान
▪ भारतरत्नांचे एकत्रित स्मारक उभारणार
▪ आदिवासी विकास विभागासाठी 8853 कोटी रुपये
▪ जिल्हा वार्षिक योजनांसाठी 9800
▪ मुद्रांक शुल्कात 1 % सूट
▪ तृतीयपंथीय मंडळासाठी 5 कोटी
▼
No comments:
Post a Comment