Tuesday, 3 March 2020

बंगळुरूमध्ये 19 वी ‘जागतिक उत्पादकता परिषद’ भरणार

🔰6 मे ते 8 मे 2020 या कालावधीत बंगळुरू (कर्नाटक) या शहरात 19 वी ‘जागतिक उत्पादकता परिषद’ आयोजित केली जाणार आहे. हा कार्यक्रम जागतिक उत्पादकता विज्ञान महासंघ (WCPS) यांच्या नेतृत्वाखाली "इंडस्ट्री 4.0 - इनोव्हेशन अँड प्रोडक्टिव्हिटी" या विषयाखाली आयोजित केला जाणार आहे.

🔰उत्पादन क्षमतेच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही जगातले सर्वात मोठे मंच आहे. तब्बल 45 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही परिषद भारतात होणार आहे. यावर्षी चर्चेत चौथ्या औद्योगिक क्रांतीवर भर दिला जाणार आहे.

🔰जागतिक उत्पादकता विज्ञान महासंघ (WCPS) 1969 सालापासून हा कार्यक्रम आयोजित करीत आहे. त्याचे मुख्यालय मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे आहे.

🔰नावीन्यपूर्ण आणि जागतिक पातळीवरील पद्धतींवर विचारपूर्वक चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वाचा व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात उद्योगपती, विद्वान, प्रशासक तसेच उद्योग, वाणिज्य आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातले कार्यकर्ते एकत्र येतात.

🔴‘इंडस्ट्री 4.0’ म्हणजे काय?

🔰‘इंडस्ट्री 4.0’ हा चौथ्या औद्योगिक क्रांतीचा उपसंच आहे जो उद्योगाशी निगडीत आहे.

🔰चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये मानवाने तयार केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर निर्मिती, सेवा, कृषी अश्या प्रमुख क्षेत्रांमध्ये दैनंदिन वापरासाठी केला जाणार आहे. ‘स्मार्ट शहर’ उपक्रम हा याच संकल्पनेचा एक भाग आहे.

🔰अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे, ज्यामार्फत मानवाच्या जागी यंत्रांची बसवणी केली जाणार. सगळ्या प्रक्रिया या संगणकाच्या माध्यमातून नियंत्रित होणार.

🔰यासंबंधीची संकल्पना 2011 साली जर्मनीने एका प्रकल्पाच्या माध्यमातून जगापुढे मांडली. पुढे 2012 साली त्याच्या अंमलबजावणीबाबत काही शिफारसी देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment