Friday, 13 March 2020

‘महामारी कायदा-1897’ लागू करण्याविषयी राज्यांना सूचना

➤ COVID-19 विषाणूचा प्रसार थांबावा यासाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना ‘महामारी कायदा-1897’ याच्या कलम 2 मधील तरतुदींना लागू करण्याविषयी सूचना केली आहे.

➤ या तरतुदींमुळे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय किंवा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकार यांच्याकडून वेळोवेळी येणाऱ्या सर्व सुचनांची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येते.

➤ या तरतुदींमुळे रेल्वेने किंवा इतर मार्गाने प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींची तपासणी करण्याचे अधिकार तसेच संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तीला लोकांपासून वेगळे करणे, रुग्णालयात, तात्पुरत्या निवासस्थानात स्थलांतरित करणे अश्या सक्तीच्या उपाययोजना करण्याचे अधिकार देखील सरकारला देते.

➤ ‘महामारी रोग कायदा-1897’ पहिल्यांदा पूर्वीच्या बॉम्बे राज्यात ब्यूबोनिक प्लेगच्या वेळी लागू करण्यात आला होता.

No comments:

Post a Comment