Tuesday, 3 March 2020

दिल्लीत 11 वी ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषद’ संपन्न झाली

🔰केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास व पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंग तोमार ह्यांच्या हस्ते दि. 28 फेब्रुवारी 2020 रोजी 11 व्या ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषद’ या कार्यक्रमाचे उद्घाटन दिल्लीत झाले.

🔴कृषी क्षेत्रातले KVKचे योगदान

🔰कृषी क्षेत्रात संशोधन व विकास करण्यात कृषी विज्ञान केंद्राचा मोठा हातखंडा आहे. आतापर्यंत पिकांचे अनेक उत्तम वाण विकसित करण्यात आले आहेत. शिवाय मार्गदर्शनासाठी 171 मोबाइल अॅप तयार करण्यात आले आणि 3 लक्षाहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर उघडण्यात आले आहेत.

🔰शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी ‘eNAM’ ही डिजिटल व्यासपीठ तयार करण्यात आले. आज यावर 585 मंडई उपलब्ध आहेत आणि आणखी 415 मंडई उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत.

🔰प्रत्येक विभागामध्ये किमान दोन फॉर्मर्स प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन (FPO) स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट आहे.

1974 साली पुडुचेरी येथे प्रथम कृषी विज्ञान केंद्र उघडण्यात आले. आज देशभरात 717 KVK कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment