1) सहज एकदाच येई सांजवेळी II या काव्यातील रस ओळखा.
1) करूण 2) श्रृंगार 3) वीर 4) शांत
उत्तर :- 2
2) खालील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
वारुणी
1) वायुरूपी 2) तट्टाणी 3) मद्य 4) तरूणी
उत्तर :- 3
3) ‘इत्थंभूत’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.
1) त्रोटक 2) सारखा 3) निराळा 4) समान
उत्तर :- 1
4) म्हणीच्या योग्य अर्थाचा पर्याय ओळखा. – ‘धर्म करता कर्म उभे राहते.’
1) दुस-याचा अनुभव घेऊन चुका टाळाव्यात 2) आपले काम सोडून नको ती चौकशी करणे
3) जे आपल्या येथे आहे तेच सर्व जगात असते 4) चांगले करताना नको ते निष्पन्न होणे
उत्तर :- 4
5) खालील वाक्यप्रकार ओळखा.
‘केवढी उंच इमारत ही ..........!’
1) विधानार्थी 2) उद्गारार्थी 3) होकारार्थी 4) संकेतार्थी
उत्तर :- 2
6) ‘निर्वासित’ या शब्दाचा अर्थ लिहा.
1) परदेशात राहणारा 2) देश सोडून गेलेला
3) घरादारासय व देशास पारखा झालेला 4) देशात राहणारा
उत्तर :- 3
7) शुध्द शब्द ओळखा.
1) शरदचंद्र 2) शारिरीक 3) शारीरीय 4) शारदिय
उत्तर :- 3
8) ‘ई’ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ?
1) संयुक्त 2) –हस्व 3) दीर्घ 4) स्वरादी
उत्तर :- 3
9) ‘पुनस् + स्थापन’ हा शब्द कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?
1) पुर्नस्थापना 2) पुन:स्थापना 3) पुनर्स्थापना 4) पुनर्रस्थापना
उत्तर :- 2
10) खालील विधाने पहा :
अ) सामान्यनामांची अनेक वचने होत नाहीत. ब) विशेषनामांची अनेकवचने होतात.
पर्यायी उत्तरांतून योग्य पर्यायी उत्तर सांगा.
1) फक्त अ बरोबर 2) फक्त ब बरोबर 3) अ व ब बरोबर 4) अ व ब चूक
उत्तर :- 4
No comments:
Post a Comment