Tuesday, 3 March 2020

1 मे पर्यंत महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त होणार: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

🔰 1 मे 2020 पर्यंत महाराष्ट्राला एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टीकच्या वापरापासून परावृत्त करण्याचे लक्ष महाराष्ट्र राज्य सरकारने निश्चित केले आहे. याविषयीची घोषणा पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

🔰 येत्या 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होणार आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्याला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. शहरांसह ग्रामीण भागांमध्ये देखील यावर भर देण्यात येणार आहे. प्लास्टीक ऐवजी विघटन होणारी आवरणे, कापडी थैली, लाकडी वस्तू अश्या पर्यायी वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे.

🔰 1 मार्च 2020 पासून मुंबईत प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने यासाठी कर्मचाऱ्यांची विशेष पथके नेमली असून कोणीही बंदी योग्य प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.

🔰 महाराष्‍ट्र शासनाच्‍या अधिसूचनेनुसार यापूर्वीच संपूर्ण महाराष्‍ट्रात प्‍लास्टिक (उत्‍पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) वर बंदी घातलेली आहे. त्यामधून प्‍लास्टिकची पिशवी, ताट, वाटी, चमचे, वेष्टण, पाणी पाऊच, इत्यादी वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment