Sunday, 9 February 2020

जिवंत रोबोट “झेनोबॉट्स” (Xenobots)


📌वैज्ञानिकांनी जैविक ‘स्टेम सेल’ पासून एक रोबोट तैय्यार केला आहे, ज्याला त्यांनी "झेनोबॉट्स" हे नाव दिले आहे. "झेनो" हा शब्द बेडकाची पेशी (झेनोपस लेव्हिज) पासून घेतला गेला आहे कारण त्याच पेशीपासून हा रोबोट तयार झाला आहे.

📌या शोधात ईशान्य अमेरिकेतल्या टुफ्ट्स यूनिवर्सिटीचे अ‍ॅलन डिस्कव्हरी सेंटर आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हरमाँट इथल्या संशोधकांचा सहभाग आहे.

झेनोबॉटची वैशिष्ट्ये

📌हे निसर्गासाठी “संपूर्णपणे नवीन जीवन-रूप” आहे.

📌झेनोबॉटची लांबी-रुंदी 1 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. ते 500-1000 जिवंत पेशींना एकत्र करून बनलेले आहे. ते विविध आकारात तयार करण्यात आले आहेत, असे की ज्यात चार पाय सुद्धा आहेत.

📌ते सरळ रेषेत किंवा गोलाकार पद्धतीने घरंगळत मार्गक्रम करू शकतात, एकत्र होऊ शकतात आणि लहान वस्तू हलवू शकतात.

📌पेशीतली ऊर्जा (cellular energy) वापरुन ते 10 दिवस जगू शकतात.

📌झेनोबॉट्स बनविण्यासाठी महासंगणकाचा वापर करण्यात आला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांच्या आकाराविषयी तसेच कार्यांविषयी विविध संशोधन केले जात आहे.

📌अश्या जैव-रोबोटमुळे मानवी, प्राणी आणि पर्यावरण-विषयक आरोग्य सुधारण्यात मदत होऊ शकते. हे यंत्र अतीसूक्ष्म प्लास्टिक गोला करून प्रदूषित महासागरे साफ करण्यासाठी वापरले जाऊ शकते. तसेच त्यांचा वापर विषारी किंवा किरणोत्सर्गी सामग्री इत्यादींसाठी मर्यादीत किंवा धोकादायक भागात प्रवेश करण्यासाठी केला जाऊ शकतो.

📌मानवी शरीरात प्रवास करण्यासाठी ते सक्षम आहेत. ते चालतात आणि पोहू शकतात, काही आठवडे जेवण न करता जगू शकतात आणि एकत्र गटातही काम करतात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...