- IQ एअर व्हिज्युअल या संस्थेनी प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रीपोर्ट 2019’ या अहवालानुसार, भारत जगातला पाचवा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला.
▪️अहवालातल्या ठळक बाबी
- 2019 साली जगातल्या सर्वाधिक प्रदूषित राजधानी असलेल्या शहरांच्या यादीत दिल्ली ही शहर अग्रस्थानी आहे.
- जगातल्या पहिल्या 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 21 शहरे भारतात आहेत.
- गाझियाबाद हे जगातले सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. द्वितीय क्रमांकावर चीनचे होतान, तृतीय व चतुर्थ क्रमांकावर पाकिस्तानचे गुजरनवाल आणि फैसलाबाद ही शहर आणि पाचव्या क्रमांकावर दिल्ली हे शहर आहे.
- पहिल्या 30 प्रदूषित शहरांमध्ये असलेली 21 भारतीय शहरे (अनुक्रमाने) - गाझियाबाद, दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, ग्रेटर नोएडा, बंधवाडी, लखनऊ, बुलंदशहर, मुझफ्फरनगर, बागपत, जिंद, फरीदाबाद, कोरोट, भिवाडी, पटना, पडवल, मुझफ्फरपूर, हिसार, कुटेल, जोधपूर आणि मुरादाबाद.
देशाला मिळालेल्या क्रमांकानुसार, बांग्लादेश ही जगातले सर्वाधिक प्रदूषित देश ठरले. त्यापाठोपाठ पाकिस्तान, मंगोलिया, अफगाणिस्तान आणि पाचव्या क्रमांकावर भारत हे देश आहेत.
- तथापि, गेल्या वर्षांच्या तुलनेत भारतीय शहरांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) ठरवून दिलेल्या PM 2.5 या प्रदूषकाच्या वार्षिक सरासरी मर्यादेच्या तुलनेनी भारतात PM 2.5 500 टक्क्यांनी अधिक होते.
- राष्ट्रीय वायू प्रदूषण 2018-2019 या काळात 20 टक्क्यांनी कमी झाले असून 98 टक्के शहरांमध्ये सुधारणा दिसून आली आहे.
—————————————————-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा