Saturday, 1 February 2020

DRDO गुजरात विद्यापीठात एक तंत्रज्ञान केंद्र उभारणार


- संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एक तंत्रज्ञान केंद्र उभारणार आहे. त्यासाठी गुजरात विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे.

- विद्यापीठात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सेंटर फॉर एक्सटेंशन अँड रिसर्च अँड इनोव्हेशन (CERI) नावाने हे केंद्र उभारण्याची शक्यता तपासून पाहिली जात आहे.

- पुढच्या आठवड्यात DRDO विद्यापीठातल्या पायाभूत सुविधा पाहण्यास आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी विद्यापीठाशी कसे सहयोग करावे आणि विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग कसा असावा हे पाहण्यासाठी एक पथक पाठवविणार आहे.

▪️ DRDO विषयी

-संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ही भारत सरकारची एक संस्था आहे,
- ज्याकडे लष्करी क्षेत्रात संशोधन आणि विकासाची जबाबदारी आहे. संस्थेची स्थापना वर्ष 1958 मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
——————————————

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...