राष्ट्रपतींचे सचिव असलेले संजय कोठारी ह्यांची नवे केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC) पदावर नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती शरद कुमार ह्यांच्या जागेवर झाली.
या नियुक्तीव्यतिरिक्त केंद्रीय माहिती आयुक्त (CIC) पदावर वर्तमानात माहिती आयुक्तपदी कार्यरत असलेले बिमल जुल्का ह्यांचीही निवड केली गेली आहे.
केंद्रीय दक्षता आयोग...
केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission) ही एक सर्वोच्च सरकारी संस्था आहे जी केंद्र सरकारच्या अंतर्गत होणाऱ्या भ्रष्टाचाराला तोंड देण्यासाठी 11 फेब्रुवारी 1964 रोजी स्थापन करण्यात आली. 2003 साली आयोगाला वैधानिक दर्जा बहाल केला. त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. आयोगात एक केंद्रीय दक्षता आयुक्त आणि जास्तीतजास्त दोन दक्षता आयुक्त असतात.
No comments:
Post a Comment