०४ फेब्रुवारी २०२०

मोहम्मद तौफिक अलावी यांची इराकचे नवे पंतप्रधान

◾️इराकचे अध्यक्ष बरहामसालेह ह्यांनी मोहम्मद तौफिक अलावी यांची इराकचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे.

◾️बरहाम सालेह यांनी आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले असल्याचे इराकचे माजी संवाद मंत्री असलेल्या मोहम्मद तौफिक यांनी सांगितले.

◾️यामुळे इराकमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला राजकीय पेच सुटला आहे.

◾️दरम्यान इराकमध्ये गेल्या चार महिन्यांपासून आणि माजी पंतप्रधान आदेल अब्दुल माहदी यांनी राजीनामा दिल्यानंतरही दोन महिन्यांपासून नागरिकांनी सरकारविरोधात सुरू केलेले आंदोलन सुरूच आहे.

◾️राजकीयदृष्ट्‌या स्वतंत्र पंतप्रधान, भ्रष्टाचार आणि आंदोलनाशी संबंधित हिंसाचाराच्या उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्या सरकारविरोधी आंदोलनाच्या चार महिन्यांत प्रामुख्याने बगदाद आणि परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...