Friday, 21 February 2020

थल सेना भवनची संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी.

🌅 दिल्ली छावणीत उभारल्या जाणा-या थल सेना भवन, अर्थात लष्कराच्या नव्या मुख्यालय इमारतीची पायाभरणी आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाली.

🌅 माणेकशॉ केंद्राजवळ एकोणचाळीस एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर हे मुख्यालय उभारलं जात आहे.

🌅 या बहुमजली इमारतीत सहा हजार कर्मचा-यांची राहण्याची सोय होईल, तसंच लष्कराची सर्व कार्यालयं याच संकुलात असतील. नव्यानं तयार केलेल्या संरक्षण दल प्रमुखांचं कार्यालयही तिथच असेल. 

🌅 येत्या पाच वर्षात हे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. वाहनांमुळे होणा-या वायू प्रदूषणाची समस्या दूर करण्यातही या नव्या संकुलाची मदत होईल, असं राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं. 

🌅 सशस्त्र दलांच्या जवानांचं शौर्य आणि बलिदानामुळे भारत हा एक समर्थ देश म्हणून पुढं आला आहे, असंही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...