🌅 जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ स्पर्धेचे डिसेंबरमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या कोनेरू हम्पीने केर्न्स चषक बुद्धिबळ स्पर्धाजिंकली.
🌅 तसेच याबरोबरच दोन महिन्यांत दुसरे विजेतेपद हम्पीला तिच्या नावे करता आले. हम्पीला त्यामुळे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळवता आला. कारण तिच्या खात्यात पाच गुणांची भर पडली.
🌅 तर स्पर्धेत अखेरच्या म्हणजेच नवव्या फेरीत हम्पीने भारताच्या द्रोणावल्ली हरिकाविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. परिणामी, सहा गुणांसह हम्पीने केर्न्स चषकावर नाव कोरले.
🌅 याच स्पर्धेत विजेतेपदाची आणखी एक दावेदार विश्वविजेती वेंजून जू हिला 5.5. गुणांसह दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. वेंजून जू हिने रशियाच्या अलेक्झांड्रा कोस्टेनियूकविरुद्ध विजय मिळवला.
🌅 कोस्टेनियूकला स्पर्धेत चौथे स्थान मिळाले. भारताच्या हरिकाला 4.5 गुणांसह पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.
No comments:
Post a Comment