Sunday, 2 February 2020

मध्यप्रदेशात बेरोजगारांना महिना पाच हजार मिळणार

◾️मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकारने बेरोजगारीच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत केलं आहे.

◾️मध्यप्रदेशातील बेरोजगारांना दर ✍महिन्याला
📌 चार हजार रुपयांऐवजी आता
📌 पाच हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतला आह

◾️ मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजनेअंतर्गत बेरोजगारांना आता दरमहा चार हजाराऐवजी पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत.

◾️राज्यातील गरीब शहरी तरुणांना रोजगार देण्यासाठी मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना सुरू करण्यात आली आहे.

◾️ या योजनेअंतर्गत तरुणांना १०० दिवसांचा रोजगार देण्यात येणार आहे.

◾️या योजनेत रोजगार प्रशिक्षणाबरोबरच दरमहा चार हजार रुपये देण्यात येतात. त्याऐवजी आता तरुणांना ५ हजार रुपये देण्यात येणार आहे, असं मध्यप्रदेशचे जनसंपर्क मंत्री पी. आर. शर्मा यांनी सांगितलं.

◾️राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच मध्यप्रदेशातील बेरोजगारीच्या प्रश्नावर काम सुरू केले होते.

◾️त्यामुळेच त्यांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना सुरू केली होती.

◾️ तरुणांना रोजगाराचं प्रशिक्षण देण्याबरोबरच या योजनेअंतर्गत त्यांना मासिक भत्ताही सुरू करण्यात आला होता.

◾️ ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली होती.

◾️या योजनेअंतर्गत राज्यातील २१ ते ३० वर्षांच्या तरुणांना लाभ मिळत आहेत. मात्र,
📌ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे, अशाच तरुणांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

◾️सध्या या तरुणांना या योजनेअंतर्गत १०० दिवसांत ४ हजार रुपयांच्या हिशोबाने १३,५०० रुपये मानधन मिळत आहे.

◾️आता यात एक हजार रुपयाने वाढ करण्यात आल्याने तरुणांना

📌 १०० दिवसांत एकूण १६,५०० रुपये मानधन म्हणून मिळणार आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment