Wednesday, 26 February 2020

पंतप्रधानांचा ‘जय विज्ञान’चा नारा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बासष्ठाव्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधताना इस्रोच्या ‘युविका’ कार्यकमाचे कौतुक केले. युवा वैज्ञानिकांसाठी हा कार्यक्रम असून त्यात ‘जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’ हाच दृष्टिकोन अनुसरण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

‘युविका’मध्ये तरुणांना सुटीच्या काळात अवकाश विज्ञान व अवकाश कार्यक्रमाची माहिती दिली जाते, त्यात त्यांना बरेच शिकायला मिळते, असे पंतप्रधान म्हणाले. श्रीहरीकोटा येथे अग्निबाणाचे प्रक्षेपण हे अभ्यागत सज्जात बसून बघता येते, अनेक शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना ते दाखवले आहे. तेथे १० हजार लोक बसण्याची व्यवस्था आहे. शाळांच्या मुख्याध्यापकांनी मुलांना तेथे घेऊन जावे, असे मोदी यांनी सांगितले.

लेह विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या एएन ३२ विमानाने नवा इतिहास रचल्याचे सांगून मोदी म्हटले आहे की, या उड्डाणात १० टक्के जैव इंधन वापरण्यात आले होते.

No comments:

Post a Comment