Thursday, 28 October 2021

महाराष्ट्रा मधील घाट



औटराम घाट
हा घाट चाळीसगाव-औरंगाबाद ह्या गाडीरस्त्यावर आहे. पायथ्याचे गाव चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव व माथ्याचे गाव कन्नड ता. कन्नड, जि. औरंगाबाद हे आहेत. ह्या घाटाने पितळखोरे लेणी, गौतम गुंफा, गौताळा अभयारण्य येथे जाता येते.

एकदरा घाट
एकदरा : पायरस्ता असलेला हा घाट असून, पायथ्याचे गाव टाकेद ता. इगतपुरी व माथ्याचे गाव कोकणगाव ता. अकोले जि. अहमदनगर यांना जोडणारा आहे. किल्ले अवंध पट्टा येथे जाता येते.

उंबरदरा घाट
पायरस्ता असलेल्या घाटाचे पायथ्याचे गाव चोंढा/साकुर्ली ता. शहापूर जि. ठाणे व माथ्याचे गाव सामरद ता. अकोले, जिल्हा अहमदनगर आहे. किल्ले रतनगड, शिपनेर येथे जाता येते

उत्तर तिवे घाट
हा घाट पायरस्त्याचा असून, पायथ्याचे गाव तिवरे ता. चिपळूण/खेड जि. रत्नागिरी व माथ्याचे गाव वासोटा ता. जावळी, जि. सातारा हे आहेत. ह्या घाटाने किल्ले वासोटा येथे जाता येते.

आंबोली घाट-४
हा घाट पायरस्त्याचा असून, ह्या घाटाचे गाव आंबोली ता. खेड जिल्हा रत्नागिरी व माथ्याचे गाव चक्रदेव ता. जावळी, जि. सातारा हे आहे. किल्ले रसाळगड, सुभारगड, महिपतगड येथे जाता येते.

आंबोली घाट-३
हा घाट सावंतवाडी-बेळगाव ह्या गाडीरस्त्यावर असून, पायथ्याचे गाव सावंतवाडी व माथ्याचे गाव आंबोली ता. सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग हे आहेत. आंबोली गाव माथ्याचे गाव असल्यामुळे ते थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. व ह्या घाटात हिरण्यकेशी ही नैसर्गिक गुहा आहे.

आंबोली घाट-२
हा घाट ता. मुरबाड जि. ठाणे व ता. जुन्नर जि. पुणे यांना जोडणारा पायरस्ता असणारा घाट आहे. ह्या घाटाचे पायथ्याचे गाव पळू ता. मुरबाड, जिल्हा ठाणे, व आंबोली हे माथ्याचे गाव आंबोली ता. जुन्नर, जि. पुणे हे आहेत. ह्या घाटाने किल्ले धाकोबा, जीवधन येथे जाता येते.

आंबोली घाट
हा घाट ठाणे व नाशिक जिल्ह्यांना जोडणारा घाट आहे. ह्या घाटाचे पायथ्याचे गाव मोखाडा ता.मोखाडा जि. ठाणे व माथ्याचे गाव अळवंडी (वैतरणा) ता. इगतपुरी जि. नाशिक हे आहेत. पायरस्ता असलेल्या घाटाने किल्ले हरिहर, उतवड, भाजगड येथे जाता येते.

आंबेनळी घाट
हा घाट ता. महाबळेश्वर जि. सातारा येथे आहे. वाडा कुंभरोशी हे घाटपायथ्याचे तर महाबळेश्वर हे घाटमाथ्याचे गाव आहेत. हा घाट महाड महाबळेश्वर गाडीरस्ता असून, ह्या घाटातून प्रतापगड, चंद्रगड येथे जाता येते.

अहुपे घाट
हा घाट पायरस्त्याचा असून, देहेरी हे घाटपायथ्याचे गाव ता. मुरबाड जिल्हा ठाणे व अहुपे घाटमाथ्याचे गाव ता. जुन्नर, जि. पुणे ह्यात आहे. या घाटाने जवळ असलेले सिद्धगड, गोरखगड, मच्छिंद्रगड व इतर किल्ल्यांना जाता येते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...