Saturday, 15 February 2020

बिमस्टेकच्या अंमली पदार्थ तस्करीविरोधी परिषदेचं उद्धाटन

🌅 बिमस्टेकच्या सदस्य राष्ट्रांसाठी अंमली पदार्थ तस्करी विरोधात  दोन दिवसीय परिषदेचं उद्धाटन गृहमंत्री अमित शाह आज नवी दिल्ली इथं करणार आहेत.

🌅 अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोनं या परिषदेचं आयोजन केलं आहे.

🌅 या परिषदेमुळे बिमस्टेकच्या सर्व सदस्य राष्ट्रांना या गंभीर विषयावर आपली मतं मांडण्याची संधी मिळणार आहे.

🌅 आशियातल्या बहुतेक राष्ट्रांना अंमली पदार्थ तस्करीची झळ पोचत आहे.

🌅 अंमली पदार्थांच्या तस्करीचा धोका जागतिक असल्यामुळे या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

🌅 बिमस्टेक ही बंगालच्या उपसागरालगतच्या भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या सात देशांची संघटना आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...