Wednesday, 26 February 2020

तंबाखू सेवनासाठी कायदेशीर वय वाढविण्याचा विचार

🔷तंबाखू सेवनासाठी कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे करण्याचा सरकार विचार करीत आहे.

🔷तसेच सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ कायदा अधिक भक्कम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

🔷त्यादृष्टीने तंबाखू नियंत्रणासाठी कायद्यात काय दुरुस्ती कराव्यात, याबाबत शिफारस करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक कायदा उपसमिती नेमली होती. या समितीने शिफारशींसह आरोग्य मंत्रालयाकडे अहवाल सादर केला आहे.

🔷तर तंबाखू सेवनासाठी कायदेशीर वय वाढविण्यासोबत नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम वाढविण्याची शिफारस या समितीने केली आहे.

🔷यासोबतच सिगारेट आणि तंबाखूयुक्त पदार्थांच्या अवैध व्यापारावर निगराणीची आणि त्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्याचे समितीने सुचविले आहे.

🔷जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणानुसार (जीएटीएस-2) तंबाखू सेवनाचे सुरुवातीचे सरकारी वय 17.9 वर्षांवून 18.9 वर्षे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment