- विदेशी थाई मागूर माशांची संगोपन केंद्रे नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक विशेष मोहीम राबविण्यास हाती घेतली आहे.
- थाई मागूर हा मासा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्येही वाढू शकतो. तो सर्वभक्षी आहे. त्यामुळे निसर्गात उपलब्ध इतर स्थानिक मासे प्रजातींना तो धोकादायक आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलनावर व इतर स्थानिक माशांच्या प्रजातीवर त्याचा विपरित परिणाम होत आहे.
- यापूर्वीच, केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाने थाई मागूर माशांचे संवर्धन करू नये याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
- राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार थाई मागूर माशांचे प्रजनन व मत्स्यपालनावर बंदी घातण्यात आली आहे. या माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
- आदेशानुसार, थाई मागूर मासे पूर्णत: नष्ट करावेत. तपासणी पथकास थाई मागूर माशांचे संवर्धन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार.
▪️ मागुर मासे प्रजाती
- मागुर माश्यामध्ये भारतीय मागुर (Clarias batrachus), थाईमागुर (Clarias gariepinus) व मोठया डोक्याचा मागुर (Clarias macrocephalus) ह्या तीन वायूश्वासी माश्याच्या प्रजाती आहेत.
- त्यापैकी महाराष्ट्रमध्ये भारतीय मागुरला देशी मागुर किंवा गावरान मागुर म्हणतात. भारतातील विविध राज्यामधली ही मूळ प्रजाती आहे. मागुर हा बिहार राज्याचा राष्ट्रीय मासा आहे.
- भारतीय मागुरच्या विशिष्ट चवी व औषधी गुणधर्मामुळे बाजारांमध्ये मोठी मागणी आहे. मागूरमध्ये मुबलक प्रथिने (21%) व जीवनसत्त्व (बी1, बी2, डी) योग्य प्रमाणात आढळते व दुसऱ्या माशांच्या तुलनेत चरबीचे प्रमाण खूप कमी असते. मानवी शरीर मागूर मधील प्रथिने सहज पचवू शकते. महिलांना गर्भावस्थेमध्ये या माशाचे सेवन करण्यास वैद्यकीय सल्ला देण्यात येतो. या माशाच्या सेवनाने मनुष्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
- थाईमागुर (Clarias gariepinus) 1989च्या अखेरीस थायलंड येथून बांगलादेशामध्ये आणण्यात आला. त्यानंतर बांगलादेशामधून बेकायदेशीररित्या भारतामध्ये थाई मागुरचा प्रवेश झाला.
- 1997 साली केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मत्स्यपालन विभागातर्फे थाई मागुरवर (Clarias gariepinus) बंदी घालण्यात आली होती. मोठया डोक्याचा मागुर (Clarias macrocephalus) मलेशिया, कंबोडिया, थायलंड व व्हिएतनाम ह्या देशामध्ये आढळतो.
——————————————————
No comments:
Post a Comment