✍नोकरी करणाऱ्या प्रत्येकांचं आजकाल पीएफ खातं आसतेच. ज्यांचं पीएफ खातेधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Organisation- EPFO) जवळपास नऊ लाख कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ब्लॉक केली आहेत.
✍केद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनेचा गैरवापर करणाऱ्या सुमारे ८० हजार कंपन्यांची यादी सरकारने केली आहे. या कंपन्यांनी फॉर्मल सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राच्या प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत बेकायदेशीर पद्धतीने तब्बल 300 कोटी रुपयांचा फायदा उचलला आहे. प्रधानमंत्री रोजगार योजनेचा अवैध लाभ जवळपास नऊ लाख जण घेत आहेत. पीएफ आणि प्रधानमंत्री रोजगार योजनेचा एकत्र लाभ घेणाऱ्या नऊ लाख कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ब्लॉक केली आहे.
✍बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या नऊ लाख लाभार्थांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. हे नऊ लाख जण या योजनेचा यापुढं लाभ घेऊ शकणार नाहीत. ही योजना लागू होण्याआधी ९ लाख जण फॉर्मल सेक्टरचा भाग होते, म्हणजेच ते आधीपासूनच पीएफचा लाभ घेत होते. बिझनेस स्टँडर्ड वृत्तानुसार, दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या नऊ लाख कर्मचाऱ्यांवर भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ खाती ब्लॉक करत कारवाई केली आहे. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांकडून २२२ कोटी रूपयांची वसूलीही करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment