Wednesday, 19 February 2020

दुसऱ्या मतदारसंघातूनही करता येणार मतदान

◾️तुम्ही राहताय मुंबई, ठाण्यात किंवा पुण्यात, तुम्ही मतदारही तिथलेच आहात; पण मतदानाच्या दिवशी काही कारणाने चेन्नई, बेंगळुरू, किंवा दिल्लीत आहात. अशा वेळी तुमचे मतदान हुकणार हे निश्चित.

◾️मात्र, मतदारांना अशा स्थितीत त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने पावले टाकण्यास सुरुवात केली असून, या कामी 'आयआयटी मद्रास'चे सहकार्य घेण्यात येत आहे.

◾️आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग मतदानासाठी करणारा हा प्रकल्प सध्या तरी संशोधन-विकासाच्या पातळीवर आहे.

◾️ ब्लॉक चेनप्रणालीचा वापर त्यासाठी करण्यात येत आहे.

◾️विशिष्ट आयपी क्रमांक असलेले कम्प्युटर, विशिष्ट इंटरनेट, बायोमेट्रिक यंत्रणा, वेब कॅमेरा अशा सगळ्या सामग्रीनिशी हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती वरिष्ठ निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना यांनी दिली

◾️. या यंत्रणेतून मतदाराची खात्री पटली की त्याला ई-मतपत्रिका दिली जाईल.

◾️त्याद्वारे मतदाराला मतदान करता येईल. मतमोजणीपूर्व टप्प्यावर अशा मतांमध्ये काही फेरफार करण्यात आलेले नाहीत ना, याची खातरजमा करण्यात येईल, अशी माहिती सक्सेना यांनी दिली.

🔰'घरच्या घरी मतदान नव्हे'

◾️'ही सुविधा प्रत्यक्षात आल्यानंतर मतदारांना ठराविक वेळेत, विशिष्ट ठिकाणी जाऊन मतदान करता येईल.

◾️ही सुविधा सर्वत्र आणि सर्वकाळ उपलब्ध नसेल. बाहेरून मतदान याचा अर्थ घरी बसून मतदान असा नव्हे. त्यासाठी ठराविक ठिकाणी जावेच लागेल,' असे सक्सेना यांनी स्पष्ट केले.

🔰कशी असेल प्रणाली?

◾️- 'टू-वे ब्लॉक चेन रिमोट व्होटिंग' ही यंत्रणा कार्यान्वित होणार

◾️- मतदार ओळखपत्रासह 'मल्टि लेअर आयटी सिस्टीम'च्या आधारे मतदाराची ओळख पटवली जाणार

◾️- बायोमॅट्रिक प्रणाली, वेब कॅमेरा यांचा उपयोग करता येणार

◾️- मतदाराची ओळख पटल्यानंतर 'ब्लॉक चेन पर्सनलाइज्ड' सिस्टीमद्वारे ई-मतदारपत्रिका मतदारापुढे येईल.

◾️- मतदान झाल्यानंतर त्याबाबत एक 'हॅशटॅग' कोड तयार होईल. त्यानंतर संबंधित मतदान गुप्त असल्याबाबत मतदाराची खात्री पटू शकेल.

◾️- असे मतदान करण्यासाठी मतदाराला मतदानापूर्वी अर्ज करावा लागणार आहे.

◾️- ही यंत्रणा अद्याप विकसित होत असून, ती प्रत्यक्षात येण्यास कालावधी आहे.

➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment