Sunday, 9 February 2020

चालू आर्थिक वर्षातला शेवटचा द्वैमासिक पतधोरण आढावा: रेपो दर कायम

- भारतीय रिझर्व्ह बँकेनी चालू आर्थिक वर्षातला शेवटचा द्वैमासिक पतधोरण आढावा 6 फेब्रुवारी 2020 रोजी जाहीर केला आहे. ही पतधोरण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांसाठी आहे.

- भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय आढावा समितीने एकमताने व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

दर पुढीलप्रमाणे आहेत –

▪️रेपो दर – 5.15 टक्के
▪️रिव्हर्स रेपो दर – 4.9 टक्के
▪️बँक दर – 5.4 टक्के
▪️कॅश रिझर्व्ह रेशियो (CRR) - 4 टक्के
▪️स्टॅट्यूटरी लिक्वीडिटी रेशियो (SLR) - 18.5 टक्के
पुढील दोन महिन्यांसाठी रेपो दर 5.15  टक्के राहणार असून, सलग दुसऱ्यांदा भारतीय रिझर्व्ह बँकेनी रेपो दर कायम ठेवले आहे.

▪️रिझर्व्ह बँकेचे वक्तव्य

- 2020-21 या वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) किंवा विकास दर 6 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

- तसेच अर्थव्यवस्थेची अवस्था कुमकुवत असून, उत्पादनांना असलेली एकूण मागणी कमी राहण्याची शक्यता आहे.

- RBIने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये डिसेंबरमधील पतधोरणाआधी सलग पाचवेळा रेपो दरात कपात केली होती.
——————————————

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...