Saturday, 29 February 2020

अमेरिका-तालिबानमध्ये आज शांतता करार

-  वॉशिंग्टनअमेरिका आणि अफगाणिस्तान तालिबान यांच्यामध्ये शांतता करार होणार असतानाच, या करारामध्ये पारदर्शकता असावी आणि तालिबानकडून ...

- अमेरिका आणि अफगाणिस्तान तालिबान यांच्यामध्ये शांतता करार होणार असतानाच, या करारामध्ये पारदर्शकता असावी आणि तालिबानकडून शांततेची हमी घेण्यात यावी, अशी मागणी अमेरिकेतील अनेक लोकप्रतिनिधींनी केली आहे. दरम्यान, अमेरिका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये शनिवारी (२९ फेब्रुवारी) दोहा येथे हा करार होणार आहे. हा करार म्हणजे, अफगाणिस्तानात २००१पासून सुरू असणाऱ्या अमेरिकेच्या हस्तक्षेपातील महत्त्वाचा टप्पा आहे.

- अमेरिका आणि तालिबान यांच्यातील शांतता चर्चा फलद्रुप होण्याच्या मार्गावर असून, सध्या हिंसाचारमुक्त आठवडा पाळण्यात येत आहे. या आठवड्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये या आठवड्यात शांतता करार होईल. अमेरिकेच्या दृष्टीने हा करार ऐतिहासिक आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेततील २४पेक्षा जास्त लोकप्रतिनिधींनी परराष्ट्रमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांना पत्र लिहिले असून, पारदर्शकता आणि अमेरिकेला सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.

-  तालिबानबरोबरील सुरक्षेविषयक हमीही जाहीर करण्यात याव्यात. गुप्तचरांच्या माहितीची देवाण-घेवाण किंवा संयुक्त दहशतवादविरोधी केंद्राची स्थापन करण्यात येऊ नये, असेही या लोकप्रतिनिधींनी निक्षून सांगितले आहे. 'अमेरिकेवर ९/११चा हल्ला करणाऱ्या अल-कायदाच्या दहशतवाद्यांना तालिबाननेच आसरा दिला होता. अमेरिका त्यांच्याबरोबर शांतता करार करत असल्यामुळे आम्हाला चिंता वाटत आहे.

-  ट्रम्प यांनी अमेरिकेची सुरक्षा सर्वोच्च असल्याचे या आधीही सिद्ध केले आहे. या धोरणाचा विचार करताना, अमेरिकन जनतेची सुरक्षा तालिबानच्या हातामध्ये जाणार नाही आणि अमेरिकेचे मित्र असणाऱ्या अफगाणिस्तानच्या विद्यमान सरकारचे महत्त्व कमी होता कामा नये, ही हमी आम्हाला हवी आहे. तसेच, अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैनिकांची संख्या अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेच्या गरजांचा विचार करूनच निश्चित करण्यात यावी. कोणत्याही तालिबानच्या कैद्याची मुदतपूर्व सुटका करण्यात येऊ नये,' असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

▪️पाक मंत्र्यांची उपस्थिती

इस्लामाबाद : अमेरिका आणि तालिबान यांच्यामध्ये शनिवारी दोहा येथे होणाऱ्या शांतता करारासाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी उपस्तित राहणार आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे माहिती व प्रसारणविषयक विशेष सहायक फिरदौस आशिक अवान यांनी ही माहिती दिली. हा करार होत असताना, कतारचे अमीर, सात देशांचे परराष्ट्र मंत्री आणि ५० देशांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
———————————————————--

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 16 जानेवारी 2025

◆ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ची वार्षिक बैठक दावोस(स्वित्झर्लंड) येथे होणार आहे. ◆ मुंबईच्या नौदल डॉकयार्ड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच...