Saturday, 29 February 2020

व्यक्तीवेध- लॉरेन्स टेस्लर

- आपला संगणकाशी होणारा संवाद ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून होतो, त्याला ‘इंटरफेस’ म्हणतात. दिवस शालांत परीक्षांचे आहेत. एकेकाळी ‘कॉपी’ हा शब्द या काळात परवलीचा ठरावा, इतका तो चर्चेत येत असे. पण अलीकडे, अगदी पदव्युत्तर शोधनिबंधांपासून पीएच.डी. प्रबंधांपर्यंत ‘कट-कॉपी-पेस्ट’चा प्रयोग बहुतांश कथित विद्वान करीत असतात.

-  संगणकशास्त्रातील प्रगतीमुळे असे अनेक ‘कॉपीकॅट’ तयार झालेत खरे; पण कुठल्याही संशोधनाचा हेतू हा वाईट नसतो. ‘कट-कॉपी-पेस्ट’बाबतही तो नव्हता. अर्थात, या ‘कॉपीकॅट’ची ‘कॉपी’ उघड करणाऱ्या आज्ञावलीही आता उपलब्ध आहेत. त्यामुळे कॉपी म्हणजे नक्कल करून ती स्वत:च्या नावावर खपवणे आता लपून राहू शकत नाही. संगणकीय कामात ‘कट-कॉपी-पेस्ट’ ही युगत प्रथम शोधून काढणारे संगणक वैज्ञानिक म्हणजे लॉरेन्स टेस्लर. त्यांचे अलीकडेच निधन झाले.

- आपला संगणकाशी होणारा संवाद ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून होतो, त्याला ‘इंटरफेस’ म्हणतात. ‘कट-कॉपी-पेस्ट’ हा आदेश म्हणजे ‘कमांड’ हा त्याचाच भाग होता. त्यामुळे एखादा मजकूर पुन्हा टंकण्याची गरज उरत नाही. ही सोय फायद्याचीच ठरली यात शंका नाही. तिच्या वापराचा हेतू हा निराळा भाग. सत्तरच्या दशकात स्थापन झालेल्या ‘झेरॉक्स पार्क’ या कंपनीत काम करीत असताना टेस्लर यांना ‘कट-कॉपी-पेस्ट’ची कल्पना सुचली.

-  त्यासाठी त्यांनी तयार केलेल्या आज्ञावलीचे नाव होते- ‘जिप्सी’! या सुविधेमुळे संपादनक्रियेत क्रांतिकारी बदल घडून आले. त्यामुळे संगणकावरील कामात कुठलाही नको असलेला भाग काढणे वा हवा तो भाग योग्य ठिकाणी बसवणे सोपे झाले. त्या वेळी ‘अ‍ॅपल’च्या ‘मॅक’ संगणकाच्या प्रसवकळा सुरू होत्या; ‘अ‍ॅपल’चे कर्तेकरविते असलेल्या स्टीव्ह जॉब्ज यांनी तेव्हा झेरॉक्स कंपनीला भेट दिली होती. त्या वेळी त्यांना सगळी माहिती टेस्लर यांनीच दिली होती.

- पुढे टेस्लरही ‘अ‍ॅपल’मध्ये दाखल झाले. पण अजूनही झेरॉक्स कंपनी टेस्लर यांच्या त्या क्रांतिकारी कल्पनेबाबत कृतज्ञ आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील झेरॉक्स पालो आल्टो रिसर्च सेंटर (पार्क) येथून टेस्लर यांची कारकीर्द सत्तरच्या दशकात सुरू झाली. नंतर ‘अ‍ॅपल’, ‘अ‍ॅमेझॉन’, ‘याहू’ या कंपन्यांतही त्यांनी काम केले. ‘अ‍ॅपल’मध्ये टेस्लर हे तब्बल १७ वर्षे मुख्य वैज्ञानिक होते.

- न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या टेस्लर यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठामधून गणिताची पदवी घेतली होती. विद्यार्थिदशेत त्यांनी मूळ संख्यांच्या निर्मितीची एक नवीन पद्धत शोधली होती. पदवीनंतर काही ठिकाणी आज्ञावलीकर्ता म्हणून त्यांनी काम केले. नंतरच्या काळात त्यांना ‘एमआयटी’ने तयार केलेला ‘लिंक’ नावाचा संगणक चालवण्याची संधी मिळाली. टेस्लर यांनी ‘डायनाबुक’ ही कल्पना मांडली होती, तो आताच्या लॅपटॉपचाच एक प्रकार होता. त्या काळात संगणक सहज वापरता येतील इतके सुलभ नव्हते.

- टेस्लर यांनी योजलेली ‘कट-कॉपी-पेस्ट’ ही सोय प्रथम १९८३ मध्ये ‘अ‍ॅपल’च्या ‘लिसा’ या संगणकात आणि नंतर ‘मॅकिनटॉश’ या संगणकात उपलब्ध करून देण्यात आली. संगणक आज्ञावलींच्या गुंताडय़ात रमणाऱ्या टेस्लर यांचे कार्यकर्तेपणही उठून दिसे. समाजहिताचे विचार ते नेहमी व्यक्त करत. सिलिकॉन व्हॅलीत बस्तान बसवल्यावर एखादी कंपनी बक्कळ पैसा कमावते हे ठीक आहे; पण नंतर त्यांनी इतर कंपन्यांनाही निधी देऊन उभे राहण्यास मदत करावी, असे त्यांचे मत होते. युद्धखोरीस त्यांचा विरोध होता; त्यामुळे वेळोवेळी त्यांनी युद्धविरोधी आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला होता.
———————————————————--
जॉईन  करा . @chaluGhadamodi

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...