Wednesday, 26 February 2020

कलम १४४ म्हणजे काय? संचारबंदी

◾️नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधक आणि समर्थक गटांमध्ये उसळलेल्या दंगली ४८ तासांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही आटोक्यात आणण्यात पोलीस अपयशी ठरले.

◾️ अतिसंवेदनशील बनलेल्या भागांमध्ये कलम १४४ म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली.

◾️मात्र संचारबंदी म्हणजे नेमकं काय आणि त्याबद्दल कायदा काय सांगतो हे खूप कमी लोकांना ठाऊक आहे.

🔰कलम १४४ आहे तरी काय? कोण लागू करू शकते हे कलम?

◾️कलम १४४ हे फौजदारी दंडसंहिता १९७३ मधील कलम आहे

◾️. हे कलम अश्या ठिकाणी लागू केले जाते जिथे मोठ्या संख्येने जमाव गोळा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतली जाण्याची वा दंगलीची संभावना असेल.

◾️हे कलम लागू असणाऱ्या परिसरामध्ये चार किंवा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असते.

◾️संचारबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी देऊ शकतात.

◾️ यात वर नमूद अधिकारी फौजदारी दंडसंहिता १९७३ मधील कलम १३४ अन्वये नोटीस पाठवून एखाद्या ठरविक व्यक्तीला काही खास कृती करण्यापासून प्रतिबंध घालण्याचे निर्देश देऊ शकतात.

◾️मात्र यासाठी काही अटी आणि नियम आहेत. अशी नोटीस एका खास भागात राहणाऱ्या व्यक्तींवर किंवा लोकांवर व त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांवर सुद्धा बजावली जाऊ शकते.

◾️ कोणत्याही भागामध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ संचारबंदीचा आदेश लागू करता येत नाही.

◾️एखाद्या ठिकाणी दोन महिने संचारबंदी लागू केल्यानंतर ती संपुष्टात आल्यावर पुन्हा नव्याने संचारबंदीचा आदेश काढता येतो.

◾️ पण जर राज्य सरकारला वाटले नागरिकांच्या जीविताला धोका व आरोग्याला धोका असेल व दंगलीची संभावना असेल असे वाटले तर ही संचारबंदी ६ महिन्यांपर्यंत सुद्धा लागू केली जाऊ शकते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...